कमी जागेत जास्त उत्पादन देणारी मुंबईतील हायड्रोपोनिक्स शेती.

कमी जागेत जास्त उत्पादन देणारी मुंबईतील हायड्रोपोनिक्स शेती: Hydroponic farming in 2024

शेती (farming) योग्य पद्धतीने पीकविली तर आपण पाहिजे तसा नफा घेऊ शकतो. सध्या तर या आधुनिक तंत्रज्ञानाच्या (modern technology ) दुनियेत मातीविना शेती सुद्धा पीकविली जाते. यातूनही लोक चांगला नफा कमवत आहेत. अशाच एका व्यक्ती विषयी आज आपण माहिती घेणार आहोत. जे हायड्रोपोनिक शेती पिकवून चांगला नफा मिळवत आहेत. आपण दिग्दर्शक आणि लेखक नितीन माळी यांच्याविषयी माहिती घेणार आहोत.

हायड्रोपोनिक शेती (Hydroponic farming ) बद्दल आज आपण जाणून घेऊया. ही शेती माती आणि जास्त जागेशिवाय पीकविली जाऊ शकते. नियंत्रित हवामानात मातीशिवाय वनस्पती वाढवण्याच्या तंत्राला हायड्रोपोनिक (Hydroponic) म्हणतात. हायड्रोपोनिक शेती पाणी, वाळू किंवा खडीमध्ये केली जाते. या तंत्रात पीक पाण्याद्वारे आणि त्याच्या पोषण स्थितीद्वारे वाढते. आजकाल अनेक ठिकाणे अशी आहेत जिथे सुपीक माती उपलब्ध नसते.

नितीन माळी यांनी 1000 स्क्वेअर फूट जागेत हायड्रोपोनिक फार्मिंग सेटअप (Hydroponic farming setup) तयार केला आणि कमी जागेत त्याला इतके चांगले उत्पन्न मिळू लागले. पुढे त्यांनी फील गुड व्हेजीज नावाचा व्यवसाय सुरू केला. ते म्हणतात हे शेतीचे तंत्र खूप फायदेशीर आहे. नांगरणीचा खर्चही नाही ना हवामानामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती. आम्ही कोणतेही रसायन न वापरता पिके घेतो आणि ऑर्डर मिळताच आम्ही ताज्या भाज्या ताबडतोब उपटून लोकांच्या घरी पोहोचवतो.

शेतकऱ्यांनी हायड्रोपोनिक पद्धतीने भाजीपाला पीकविला तर बक्कल पैसा कमवू शकता. सध्या ऑनलाईन सर्व तंत्र उपलब्ध झाले आहेत. मातीचा वापर न करता ते विदेशी भाज्या पिकवत आहेत. औषधी वनस्पती (Medicinal plants), मायक्रोग्रीन, चेरी टोमॅटो यासारख्या 100% रासायनिक मुक्त भाज्या थेट लोकांच्या घरी पोहोचवतात आणि लाखों रुपये कमवितात.

सामान्य शेतकरीही शेतीबरोबरच हायड्रोपोनिक शेती करून चांगला नफा मिळवू शकतात. केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना हायड्रोपोनिक शेतीसाठी अनुदान मिळते. राज्या-राज्यानुसार अनुदानाची रक्कम वेगवेगळी आहे. याची योग्य माहिती शेतकरी (farmers) घेऊन चांगला पैसा कमवू शकतो.

Leave a Comment