आश्चर्यकारक! सेंद्रिय आणि पर्यावरणपूरक पद्धतीने गाईच्या शेणापासून बनवले एकदम झक्कास घर:
तुम्हाला माहीत नसेल पण नैसर्गिक (natural) गोष्टींप्रमाणेच शुद्ध शेणातही अनेक गुणधर्म असतात. परंतु याचा योग्य वापर कसा केला पाहिजे हे अनेकांना माहीत नसते. आज आपण गाईच्या शेणापासून (cow dung) बनविलेल्या घराविषयी माहिती घेणार आहोत. तुम्ही एखादं छानस घर गाईच्या शेणापासून बनवू शकता. हे घर एकदम सेंद्रिय आणि पर्यावरणपूरक (Organic and eco-friendly) असणार आहे.
हे ऑरगॅनिक घर (Organic home) सिमेंट किंवा काँक्रीटचे पासून बनविलेले नाही तर गाईच्या शेणाचे आहे. पंजाबमधील डॉ. वीरेंद्र या व्यक्तीने बांधले आहे. रसायनांच्या या युगातही निसर्गाने आपल्याला अनेक उत्तम संसाधने दिली आहेत. गाईच्या शेणात अनेक गुणधर्म आहेत आणि ते निसर्गाने दिलेले वरदान आहे. याची गरज आणि उपयोग आपण योग्य पद्धतीने केला पाहिजे. हे देसी शेणापासून बनवलेले घर पूर्णपणे टिकाऊ आणि पर्यावरणपूरक (eco-friendly) तसेच रसायनमुक्त आहे. हे अतिशय सुंदर आणि देसी घर गाळक्रीट, माती, दगड आणि टाकाऊ वस्तू वापरून बनवण्यात आले आहे.
डॉक्टर असल्याने वीरेंद्र म्हणतात, “देशी गायीच्या शेणाचे अनेक फायदे आहेत. सेंद्रिय पिकवणे (Organic farming) आणि खाणे मानवांसाठी निरोगी आहे. तसेच सेंद्रिय वातावरणात जगणे देखील खूप महत्वाचे आहे. यामुळे आपले शरीर तंदरुस्त राहते. देशी गायीच्या शेणापासून बनवलेल्या प्लास्टर आणि विटांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यापासून बनवलेले हे घर काँक्रीटप्रमाणेच भूकंपाचे धक्के सहन करण्यास सक्षम आहे. तसेच घराला प्रदूषण आणि जंतूंपासून मुक्त ठेवते. याशिवाय ते कॉंक्रिटपेक्षा (concrete) स्वस्त आहे. शेणापासून बनवलेले घर पर्यावरणासाठी देखील चांगले आहे”.
त्यांचे खास घर आज समाजासाठी एक उदाहरण आहे आणि ते पाहण्यासाठी आजूबाजूचे लोकही येतात. हे घर मनमोहक असल्याने लोकांची गर्दी होती. अशी घरे खेड्यापाड्यांमद्धे अधिक उजळून दिसतात.