Kusum Solar Yojana केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक नवनवीन योजना राबवत असतं. ज्यातून शेतकऱ्यांना विविध योजणांचा फायदा होतो. आज आपण अशाच एका योजनेविषयी माहिती घेणार आहोत. ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल. आपण ज्या योजेनेची माहिती घेणार आहोत त्या योजेनेचे नाव आहे Kusum Solar Yojana. या योजनेचा शतकऱ्यांनी लाभ कसा घ्यावा? याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पंतप्रधान कुसुम सोलार योजनेचा फायदा
पंतप्रधान कुसुम सोलार योजनेतुन शेतकऱ्यांना सोलर पंप दिले जातात. शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता यावं, शेतीला पाणी देता यावं, यासाठी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी योजना राबविली जाते. या योजनेतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 3, 5 आणि 7.5 HP क्षमतेचे सौर पंप या योजनेतून दिले जातात. लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण पंपाच्या किंमतीच्या 90 % एवढं अनुदान दिलं जातं.
हे शेतकरी असतील लाभार्थी
ज्या शेतकऱ्याची जमीन अडीच एकरपर्यंत आहे त्या शेतकऱ्याला 3 एचपी पंप.
अडीच ते 5 एकरपर्यंत जमीन आहे त्या शेतकऱ्यास 5 एचपी पंप
ज्या शेतकऱ्याची 5 एकरपेक्षा जास्त जमीन असल्यास 7.5 एचपी पंप
पात्र शेतकरी आणि कागदपत्रे
- पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी.
- शेततळे, विहीर, बोअरवेल, नदी/ नाले याच्या शेजारील शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी.
- अटल सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप अंतर्गत लाभ न मिळालेले शेतकरी.
कागदपत्रे –
- सातबारा उतारा, त्यावर विहिरीची किंवा बोअरची नोंद आवश्यक आहे.
- सामायिक सातबारा असेल तर 200 रुपयांच्या बाँडवर इतर भोगवटादारांचं ना हरकत प्रमाणपत्र
- आधार कार्ड, जातीचा दाखला, बँक पासबुक फोटो आणि पासपोर्ट आकाराचा फोटो
या योजनेसाठी नोंदणी अशी करा
1. पीएम कुसुम सोलार योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी सगळ्यात आधी mahaurja.com असं सर्च करायचं आहे.
2. त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरचण ही वेबसाईट ओपन होईल. उजवीकडे “महाकृषि ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी” हा पर्याय दिसेल. त्याच्यावर क्लिक करा.
3. त्यानंतर स्क्रीनवर एक सूचना दिसेल, ती वाचून क्लोज करायची आहे. त्यानंतर उजवीकडे “सिलेक्ट लँग्वेज” या पर्यायावर क्लिक करून मराठी भाषा निवडा.
4. ‘’पीएम कुसुम योजना: लाभार्थी नोंदणी” हा अर्ज ओपन होईल.
5. सध्या तुम्ही डिझेल पंप वापरत आहात का?, या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. इथं होय किंवा नाही उत्तर निवडायचं आहे. ‘होय असेल तर पंपाच्या उर्जेचा स्रोत, त्याचा प्रकार, उपप्रकार, किती क्षमतेची, वर्षाला किती लीटर डिझेल लागतं ते सांगा.
6. त्यानंतर ‘’ अर्जदाराची वैयक्तिक व जमीन विषयक माहिती ’’ भरायची आहे. आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, पुढे जिल्हा, तालुका, गाव निवडायचं आहे. मोबाईल क्रमांक, आणि जात वर्गवारी निवडा.
3 एचपी पंपाची किंमत
एकूण किंमत – 1,93,803 रुपये
सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा– 19,380 रुपये
एससी/एसटी प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा -9,690 रुपये
5 एचपी पंपाची किंमत
एकूण किंमत– 2,69,746 रुपये
सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा – 26,975 रुपये
एससी/एसटी प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा -13,488 रुपये
7.5 एचपी पंपाची किंमत
एकूण किंमत – 3,74,402 रुपये
सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा – 37,440 रुपये
एससी/एसटी प्रवर्गातील लाभार्थ्याचा हिस्सा -18,720 रुपये