कौतुकास्पद: पती, दीर आणि सासऱ्यानं आत्महत्या केल्यावरही लढत राहिली, वाचा शेती कसणाऱ्या एका रणरागिणी कहाणी. Successful women farmer

Successful women farmer: घरातले तीन कर्ते पुरुषांनी आत्महत्या केली. तरीही ती खचली नाही लढत राहिली. तिचं नाव आहे ज्योती देशमुख. आज आपण या शेती (farm) कसणाऱ्या रणरागिणी बद्दल जाणून घेऊया.

ज्योती देशमुख या कट्यार गावच्या आहेत. हे गाव विदर्भातल्या अकोल्यापासून 25 किलोमीटर अंतरावर आहे. ज्योती देशमुख या एकट्या 29 एकर शेती कसत आहेत.

ज्योती देशमुख यांनी त्यांच्या मुलाला इंजीनियर केलं.तो पुण्यात एका कंपनीत नोकरी करत आहे. त्यांनी शेतात बोअरवेल घेतला त्याला चांगले पाणी लागलं. शेतीच्या उत्पनावर (farm income) त्यांनी नवीन ट्रॅक्टर (tractor) घेतला. घराचं बांधकाम केलं. असे त्या मुलाखत देताना म्हणाल्या.

त्या म्हणाल्या पूर्वी शेतात (farming) आम्ही फक्त मूग घ्यायचो. 2007 मध्ये खूप पाऊस झाला आणि आमचा सगळा मूग पावसात गेला. सगळं नुकसान झालं. त्या टेंशनमध्ये माझ्या नवऱ्यानं आत्महत्या केल्याची ते सांगतात.

यानंतर अनेक अडचणीना सामोरे जात. ज्योती देशमुख यांनी शेती करायचं ठरवलं. लोकांचं म्हणणं होतं की, बाईनं कुठे शेती करायची असते का, देशमुखांच्या घरातल्या बाईनं शेती करणं शोभतं का? अशा गोष्टींना विरोध करत शेती (farm) कसत राहिल्या.

मला शेतीतला काहीच अनुभव नव्हता. मी कधीच शेती केली नव्हती. पण मालक गेल्यानंतर शेतात जायला लागले. स्वत:हून कामं करायला लागले. निंदणं, खुरपणं, बैलगाडी चालवणं सगळं स्वत:च शिकले. इतकंच काय ट्रॅक्टर घेतला आणि तोही शिकल्याच त्या मुलाखतीत सांगतात.

यावर्षी त्यांनी शेतात सोयाबीन, कापूस, तर, उदीड या पिकांची पेरणी केली आहे. त्यांच्या या मेहनत कौतुकास्पद आहे. म्हणतात पीकविल्यावर सोनंही पिकतं. ज्योती देशमुख यांचा प्रवास प्रत्येक शेतकऱ्यांने वाचला पाहिजे.

Leave a Comment