Micro Solar Pump: शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर: पुण्यातील या व्यक्तीने शेतकऱ्यांसाठी बनविला मायक्रो सोलर पंप.

Two American build micro solar pump in Pune: केंद्र सरकार आणि राज्यसरकार (central and state government) शेतकऱ्यांसाठी अनेक नवनवीन योजना राबवत असतं. मात्र आता दोन अमेरिकन व्यक्तींनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आणली आहे. ज्यातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. भारतीय शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी दोन अमेरिकन व्यक्तींनी पुणे शहरात एक स्टार्टअप (startup) उभारले आहे. या स्टार्टअपच्या माध्यमातून या दोन अमेरिकन व्यक्तींनी मायक्रो सोलर पंप Micro Solar Pump तयार केला आहे. याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठी बचत होणार आहे. चला तर पाहूया शेतकऱ्यांना याचा फायदा कसा घेता येईल?

पुणे शहरात गेल्या सात वर्षांपासून दोन अमेरिकन राहत आहेत. या दोन अमेरिकन व्यक्तींनी शेतकऱ्यांसाठी नवीन मायक्रो सोलर पंप (micro solar pump) तयार केला आहे. या पंपामुळे शेतकऱ्यांच्या विजेच्या बिलात मोठी बचत होणार आहे. तर दुसरीकडे रोज घेऊन जाणे सोपे असल्यामुळे चोरांच्या समस्येपासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. हे दोन फायदे शेतकऱ्यांनाठी (Farmer) फार उपयुक्त ठरणार आहेत.

पहिल्यांदा स्टार्टअप सुरु केला

MIT मध्ये शिक्षण घेत असताना मास्टर पदवीच्या माध्यमातून त्यांनी टाटा ट्रस्टसोबत काम केले. मग भारतीय शेतकऱ्यांसाठी त्यांनी स्टार्टअप (startup) सुरु केले. हे दोन व्यक्ती मूळचे अमेरिकन आहेत. त्यांनी कॅटी टेलर आणि व्हिक्टर लेस्नीवस्की यांनी खेतवर्क (khetwork) नावाने स्टार्टअप सुरु केले. खेतवर्क्सने आतापर्यंत 900 शेतकऱ्यांना पंप वाटप केले आहेत.

मायक्रो सोलर पंप असा तयार केला

शेतकऱ्यांशी संवाद साधून व्हिक्टर यांनी शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी समजून घेतल्या. या संवादामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीला (farming) पाणी पुरवठ्याची समस्या दिसून आली. याशिवाय त्यांना सोलार पंपची चोरी होण्याच्या समस्या पण सांगितल्या गेल्या. यानंतर त्यांनी नवीन प्रकल्पावर काम सुरु केले. भारत सरकारकडून (indian government) त्यांनी मायक्रो सोलर पंपचा आरखडा मंजूर करून घेतला. पेटेंट घेणे, पुणे शहरात युनिट उभे करण्याचे काम त्यांनी केले आणि यानंतर त्यांनी पुणे शहरात मायक्रो सोलार पंप निर्माण केला.

शेतकऱ्यांची मोठी बचत

मायक्रो सोलर पंपामुळे आता शेतकऱ्यांचे 10 ते 12 हजार वीज बिलाची बचत होत आहे. अनेक शेतकरी या पंपाचा वापर करत आहेत.

Leave a Comment