Pm Kisan Yojana: या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2 हजार रुपये; शेतकऱ्यांनो करा असा अर्ज.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असतं. ज्यामधून शेतकऱ्यांना योजना लाभ घेता येतो. यापैकीच महत्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना.
pm kisan yojana अंतर्गत देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात.

शेतकऱ्यांना ही रक्कम 3 हफ्त्यांनी चार चार महिन्यांच्या अंतरावर दिले जातात. या योजनेचा फायदा देशातील करोडो अल्पभूधारक शेतकऱ्यांनी घेतला आहे.

13 व्या हफ्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. यानुसार लवकरच 14 व्या हफ्त्याचे देखील पैसे शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत.
शेतकऱ्यांना पुढील 14 वा हफ्ता मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

eKYC त्वरित करून घ्या :

ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नाही त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजेनचा लाभ दिला जाणार नाही. त्यामुळे जर पीएम किसान योजनेचा 14 वा हफ्ता हवा असेल तर शेतकऱ्यांना ई-केवायसी करावे लागणार आहे.

1) शेतकरी अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर ई-केवायसी करू शकतात.

2) महत्वाचे म्हणजे सरकारच्या नियमानुसार फक्त पती किंवा पत्नी दोघांपैकी एकच व्यक्ती लाभ घेऊ शकतो. योजनेच्या नियमानुसार कुटुंबातील एकच व्यक्ती लाभ घेऊ शकतो.

शेतकरी मित्रांनो याप्रमाणे तपासा लाभार्थी स्थिती

पहिल्यांदा pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा, आता ‘फार्मर्स कॉर्नर’ या पर्यायावर ा.
त्यानंतर लाभार्थी स्थितीवर ा.
आता तुमच्या राज्याचे, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव टाका.

त्यानंतर ‘Get Report’ पर्यायावर क्लिक केल्यावर संपूर्ण यादी उघडेल.तुम्ही तुमच्या हप्त्याचे तपशील या यादीत पाहू शकता. येथे तुम्हाला स्टेटसच्या पुढे E-KYC, पात्रता आणि जमीन साईडिंग असे लिहिलेला संदेश पाहावा लागेल.

ई-केवायसी, पात्रता आणि जमीन साईडिंग म्हणजेच या तिघांच्या पुढे ‘होय’ असे लिहिले असेल तर तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळू शकतो.

Leave a Comment